Friday, August 21, 2020

विचार आणि काव्य



माझ्या सर्व मित्रांना नमस्कार..

हा माझा पहिलाच मराठी ब्लॉग आहे. माझी मातृभाषा मराठी असल्याने माझे मराठीवर जास्त प्रेम आहे आणि त्या प्रेमातून, मला माझे 'काव्य आणि विचार' या विषया द्वारे ब्लॉग सादर करीत आहे.

      सदरचा ब्लॉग हा मुख्यत्वे काव्य सादर करण्यासाठी आहे. परंतु जर काव्यासोबत विचारही मांडता आले तर माझ्यामते नाते जुळून येण्यास जास्त मदत होईल. सध्याचा काळ म्हणजे आपण कोणीही यापूर्वी न-अनुभवलेला असाच आहे. कोरोना आणि लॉक-डावून हे एक अभुतपुर्व भयंकर जग आपण सर्व अनुभवत आहे असो ! मला खूप काही बोलायचे मांडायचे आहे परंतु क्रमवार आपण भेटत जाऊ आणि परस्पर संबंध नाते वाढवत जाऊ.

     माझे बरेच लेखन प्रकाशनाची वाट पाहून पाहून मावळतीला लालसर रंग घेऊन घरातील कपाटात पडून कासावीस होत होते, आणि अश्यातच मला माझ्या एका मित्राने ब्लॉग लेखनाचा मार्ग सुचवला म्हणून मनाचे बहुतेक ओझे कमी झाले आहे कारण मला आता तुम्हाला, माझ्या वाचकांना भेटण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही. म्हणून मी खूप खुश आहे.

     आज आपला देश खूपच मोठ्या संकटातून मार्ग काढत आहे या देशवासियांना मानवंदना देऊन माझे पाहिले काव्य मांडत आहे.

   ****   राजकारण.......

माणुसकीला आज शोधायचे आहे

अंधाराला थोडेसे जोखायचे आहे

उपासमारीने लोक रस्त्यावर तडफडत होते आणि

सरकारी कागदपत्रे अन्नपूरणाचे बॉम्ब फोडत होते.

लोक रोजगार म्हणाले तर ते मेट्रो-बुलेट वर वेळ काढतात !

लोक महागाई म्हणाले तर ते इंटरनेट फ्री वर जोर देतात !

लोक औषध-उपचार विचारले तर ते धर्माचा प्रसार करतात !

लोक सैन्याच्या बलिदानाचे विचारतात तर ते मोबाईल अँप उद्धवस्त करतात !

मी सत्ता-धार्यांना प्रश्न केला तर मी

विरोधी पक्षाचा होतो !

मी उत्तर मागितले तर 

आतंकवादी, देशद्रोही होतो !

त्यांच्या भक्तांचा लडिवाळ नजरेत

मी सर्वसामान्य ! असूनही गुन्हेगार होतो .....

For online earning with simple steps

https://paidera.com/?r=1471137


No comments:

Why Buddhism still not come back in India ?

Why Buddhism still not come back in India ?                                                                     - Synopsis - 1) Buddhism is ...