निर्मिक
ते अल्ला म्हणतात, हे ईश्वर म्हणतात,
मी नक्की कोण आहे?
पूर्वी हिंदू आणि मुस्लिम म्हणून लोकांनी
माझी वाटणी केली,
दंगलीत नेत्यांनी राम-रहीम म्हणून
सरे आम छाटणी केली,
कधी मंदिर जिंकले म्हणून जल्लोष होतो
कधी मस्जिद पुढे जयघोष होतो.
हे ना ते जिंकतात प्रत्येक वेळी
पण मीच नेहमी हारत जातो.
कधी धार्मिक होऊन माखतो मी
कधी मार्मिक होऊन सांडतो मी
देव - अल्ला म्हणणारे
माझ्याच दैवी पणाला कलंकित करतात.
कधी कुठे का ? माणुसकी विना परमात्मा शोधतात,
ते अजून मला त्यांच्याच निर्मितीत शोधत असतात.
कधी मंदिर? कधी मस्जिद ? कधी चर्च ? तर कधी गुरुद्वारा ?
पण कधीच माझ्या निर्मितीतील ते स्वत्व पाहत नाहीत, ते कधी अस्तित्वातील सत्य शोधत नाहीत.
कधी प्रेमाला प्रेम आणि भावनेला संवेदना देत नाहीत.
तर मी या अंध भक्तांना कसा दिसेना?
मी कान कानात असतो !
मी जना मनात वसतो !
माणुसकी शिवाय मी कधीच कोठेच वावरत नसतो .
*****************
No comments:
Post a Comment